पान एक
---------------
14670
ओझर : नगरपरिषद इमारतीच्या भूमिपुजनाप्रसंगी आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष अनिता घेगडमल. शेजारी अनिल कदम, यतिन कदम आदी.
भूूमिपुजननिमित्त ओझरला सर्व पक्षीय नेते एकत्र
विकासाला खीळ बसू देणार नाही : आमदार दिलीप बनकर
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता. १५ : राजकारण आणि विकास या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. राजकारणात निवडणुका येत असतात आणि जात असतात; मात्र जनतेचा आणि गावाचा विकास महत्त्वाचा असून तो थांबता कामा नये. निवडणुकांपुरतेच राजकारण मर्यादित ठेवून शहराच्या विकासाला कोणत्याही परिस्थितीत खीळ बसू देता कामा नये, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले.
ओझर नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत व बाणगंगा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
ओझर नगरपरिषदेच्याआमदार बनकर यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. प्रशासकीय इमारतीसाठी आणखी ४ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची ग्वाही या वेळी दिली.
आमदार बनकर म्हणाले, की प्रशासकीय इमारतीसाठी ६ कोटी रुपये, तर मारुती वेस येथील पुलासाठी ४ कोटी रुपयांचा निधी असून ओझरच्या विकासासाठी यापूर्वी ५२ कोटींचा निधी दिला असून नवीन आराखड्यात १० ते ११ कोटी उपलब्ध करून दिले आहेत.
शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन विकास आराखडा राबवण्याची गरज माजी आमदार अनिल कदम यांनी व्यक्त केली. सर्वांना सोबत घेऊन ओझरच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांनी सांगितले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवर व लोकप्रतिनिधी
या वेळी नगराध्यक्ष अनिता घेगडमल, उपनगराध्यक्ष रूपाली महाले, मुख्याधिकारी किरण देशमुख, कॉंग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, ''ओमको''चे अध्यक्ष राजेंद्र शिंदे, प्रदीप अहिरे, हेमंत जाधव, धर्मेंद्र जाधव, गटनेते सुनील कदम, गटनेते प्रमोद कुटे, नगरसेविका पल्लवी देशमुख, योगिता कदम, कोमल थूल, नेहा जाधव, रोहिणी जाधव, रूपाली शेळके, रूपाली आढाव, ज्योती कुंदे, वेदांती सूर्यवंशी, शिल्पा पगारे, दिपाली शिंदे, उषा गवळी, नगरसेवक राकेश जाधव, अल्ताफ अत्तार, खंडेराव जोगारे, नीलेश चौरे, महेश शेजवळ, राजू भडके, जय जाधव, रोहित लभडे, एचएएल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सरचिटणीस संजय कुटे उपस्थित होते.
---------
सत्ताधारी, विरोधक एकाच व्यासपीठावर
ओझर नगरपरिषदेच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकलेले शिवसेना, शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, भाजप आणि बहुजन आघाडी अशा सर्वच प्रमुख पक्षांचे नेते या निमित्ताने एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले.
----------
गाळेधारकांना आश्वासन
नगरपरिषद इमारतीची जागा होत असलेल्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आमदार अनिल कदम व माजी सरपंच राजेंद्र शिंदे यांनी केली. बाजार समिती शेजारील आणि जुन्या म्हसरूळ रस्त्यावरील अतिक्रमण हटवून गाळेधारकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यतिन कदम यांनी दिले.