वडाळा पाथर्डी रस्त्याला भगदाड गंगापूर घटनेची पुनरावृत्ती टळली

वडाळा पाथर्डी रस्त्याला भगदाड गंगापूर घटनेची पुनरावृत्ती टळली
Published on
फोटो : B12666 इंदिरानगर : वडाळा- पाथर्डी रस्त्याला पडलेल्या खड्ड्याची पाहणी करताना अधिकारी -- वडाळा-पाथर्डी रस्त्यावर १० फुटांचा खड्डा तातडीने दुरुस्तीचे काम हाती; पुन्हा एकदा निकृष्ट कामाचा नमुना इंदिरानगर, ता. ९ : येथील वडाळा- पाथर्डी या मुख्य रस्त्याला पडलेले मोठा खड्डा आढळल्यानंतर स्थानिक नागरीक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तत्परता दाखवल्याने २१ ऑगस्टला गंगापूर रोडवर झालेल्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. बुधवारी (ता. ९) सकाळी येथील सुदर्शन लॉन्स समोर या रस्त्याला आठ ते दहा फूट खोल मोठा खड्डा पडल्याची बाब येथील यशवंत झिंजुर्डे या युवकाच्या लक्षात आली. त्याने भाजप गटनेता ॲड. श्याम बडोदे यांना याबाबत कळवले. ॲड. बडोदे यांनी तातडीने थेट महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याशी संपर्क साधत त्यांना संबंधित व्हिडिओ आणि फोटो पाठवत मोठा अपघात होऊ शकतो याबाबत सजग केले. सोबत महापालिकेचे अधिकारी बोरसे, हांडगे आणि बागूल यांनादेखील कळवत त्यांच्यासह तेथे पोचले. खबरदारी म्हणून त्या खड्ड्याच्या आसपास दगड आणि झाडाच्या फांद्या टाकून संदीप जगझाप, राम बडोदे, सुजित मोरे आदींनी खडा पहारा देत नागरिकांना सावध केले. आयुक्तांनी ॲक्शनमध्ये येत तातडीने येथील दुरुस्ती हाती घेण्याचे आदेश दिले असून कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स तारांच्या साहाय्याने घट्ट बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान हा खड्डा का पडला, याच्या कारणांचा शोधदेखील घेणे सुरू झाले आहे. जवळून गेलेल्या ड्रेनेज लाइनमुळे आतून रस्ता भुसभुशीत झाला की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भागातील अनेक पावसाळी नाले लुप्त झाले असून पाण्याचे नवीन स्रोत तयार झाले आहेत. त्यामुळेदेखील कदाचित हा रस्ता आतून खचला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात गंगापूर रोडवर आनंदवली ते नवशा गणपती या मुख्य रस्त्यावर याच प्रकारचा मोठा खड्डा पडला होता. त्यात खडी वाहून नेणारा हायवा उलटा पडला होता. त्या प्रकारामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामांची मोठी चर्चा झाली होती. अगदी तशीच परिस्थिती या ठिकाणी उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र सर्वांच्याच तत्परतेने आणि सजगतेने संभाव्य दुर्घटना टळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com