मंत्र्यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित

मंत्र्यांच्या भेटीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित
Published on
फोटो : B12756, B12757 इंदिरानगर : स्वागताचा स्वीकार करतांना मंत्री गिरीश महाजन. दुसऱ्या छायाचित्रात मंडळ भेटीसाठी आलेले मंत्री छगन भुजबळ -- गणेशोत्सवाचे मंत्र्यांकडून कौतुक इंदिरानगरचे भव्य देखावे ठरले आकर्षण इंदिरानगर, ता. २१ : रविवारी (ता. २०) रात्री पालकमंत्री गिरीश महाजन आणि अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी इंदिरानगर परिसरातील विविध मंडळांना स्वतंत्र भेटी दिल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला. इंदिरानगर भागात साकारलेले भव्य देखावे संपूर्ण शहरच नाही तर जिल्ह्याच्या आकर्षण ठरल्याचे त्यांनी नमूद केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक जबाबदारीचे प्रबोधन, आगामी कुंभमेळ्याबाबत माहिती, व्यसनमुक्तीची गरज आणि स्थानिक कलाकारांना उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचे मंत्र्यांतर्फे कौतुक करण्यात आले. ॲड. श्याम बडोदे यांचे श्री प्रतिष्ठान, नगरसेविका सुप्रिया खोडे आणि माजी नगरसेवक सुनील खोडे यांचे इंदिरानगर उत्सव समिती, डॉ. दीपाली कुलकर्णी यांचे अजय मित्रमंडळ, नगरसेवक चंद्रकांत खोडे यांचे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आदी मंडळांना मंत्र्यांनी भेटी दिल्या. त्यांच्यासोबत आमदार देवयानी फरांदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, सिडको सभापती बाळकृष्ण शिरसाठ, नगरसेवक सुधाकर बडगुजर, भगवान दोंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com