09839
पिंपळगाव बसवंत : कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव रॅलीचे स्वागत करतांना भास्करराव बनकर, समवेत दिनेश अनारसे.
कै. बी. पी. पाटील महाविद्यालयतर्फे रॅली
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता. २६ : निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित कै. बी. पी. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जेईई आणि सीइटी परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले. महाविद्यालयातर्फे या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ सत्कार सोहळा आणि ‘यशोत्सव रॅली’ काढण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला खासदार भास्करराव भगरे, उपाध्यक्ष भास्करराव बनकर, शिक्षक नेते शिवाजी निरगुडे, सहसचिव अरूण महाले, संचालक सोमनाथ मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील मेहनत, पालकांचे योगदान आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
प्रा. मीनाक्षी समीर जाधव यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. सत्कारानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ‘यशोत्सव रॅली’ला प्रारंभ झाला. विंटेज व्हॅन, आकर्षक रथ आणि ट्रॅक्टरमधून गुणवंत विद्यार्थ्यांची राजेशाही मिरवणूक काढण्यात आली.
या वेळी कार्यक्रमास संजय मोरे, रामराव मोरे, आर.डी.जाधव, समीर जाधव, रामराव बनकर, सुरेश निरगुडे, पंढरीनाथ संधान, सुधाकर मेंगाणे, ॲड.रणजित चव्हाण, अशोक खोडे, साहेबराव डेरे, रमेश विधाते, कौस्तुभ तळेकर, व्यवस्थापकीय संचालक दिनेश अनारसे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भंडारे, प्राचार्य संदीप पाटील, योगेश शिरसाठ आदी उपस्थित होते.
----