छत्रपती शाहु महाराज
थोर समाजसुधारक :आमदार बनकर
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगांव बसवंत, ता.२६ : समता, बंधुता आणि सामाजिक न्याचा दीप अखंड तेवत ठेवणारे छत्रपीत शिवाजी महाराज हे थोर समाज सुधारक होते. लोककल्याणकारी योजना, प्रत्येक घटका शिक्षण असे दुरदृष्टी असलेले राजर्षी शाहु महाराजाचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील. समाजसुधारक गणपतदादा मोरे यांच्या भेटीच्या निमीत्ताने पिंपळगाव बसवंतला त्यांचा पदस्पर्श झाला होता, असे प्रतिपादन आमदार दिलीप बनकर यांनी केले.
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमीत्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी सरपंच भास्करराव बनकर, मविप्रचे उपाध्यक्ष विश्वासराव मोरे,माजी संचालक दिलीप मोरे हे प्रमुख उपस्थित होते. निफाड फाट्यावर शाहु महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी अभिवादन केले.
यावेळी बाळासाहेब बनकर सुरेश खोडे, गणेश बनकर, संजय मोरे, महेंद्र गांगुर्डे, अशोक दळवी, राजेंद्र खोडे, राहुल बनकर, विनायक खोडे, आशिष बागुल, महेंद्र शिंदे, अजय गायकवाड, संतोष गांगुर्डे आदी उपस्थित होते.
-----------
09846
पिंपळगाव बसवंत : शाहु महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना आमदार दिलीप बनकर, समवेत भास्करराव बनकर, दिलीप मोरे, बाळासाहेब बनकर आदी.