२५ वर्षांची प्रतीक्षा संपली! निफाड रोड–आहेरगाव रोड शिवरस्त्याच्या डांबरीकरणासाठी ८० लाखांचा निधी भूमिपूजन संपन्न

२५ वर्षांची प्रतीक्षा संपली! निफाड रोड–आहेरगाव रोड शिवरस्त्याच्या डांबरीकरणासाठी ८० लाखांचा निधी भूमिपूजन संपन्न
Published on
पान-३ ॲंकर --------------- PML26B10077 पिंपळगाव बसवंत ः निफाड रस्ता- आहेरगाव रस्ता शिवरस्त्याच्या डांबरीकरणाच्या भूमिपूजनप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, गणेश बनकर, विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे, संदीप सुराणा आदी ---------------- शिवरस्त्याच्या डांबरीकरणासाठी ८० लाखांचा निधी २५ वर्षांची प्रतीक्षा संपली ः निफाड रस्ता- आहेरगाव रस्ता काम मार्गी, शेतीसाठी फायदा सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१ ः पिंपळगाव नगरपरिषदेच्या प्रभाग चारमधील निफाड रस्ता ते आहेरगाव रस्ता या शिवरस्त्याच्या डांबरीकरणासाठी तब्बल ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गेल्या २० ते २५ वर्षांपासून प्रलंबित असलेली नागरिकांची ही बहुप्रतीक्षित मागणी आता मार्गी लागणार असून, यामुळे शेतीसाठी मोठा फायदा होणार आहे. या कामाचे भूमिपूजन मंगळवारी रानमळा, निफाड रोड येथे झाले. नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, राजेश पाटील, गटनेते नीलेश पाटील, नगरसेविका रेखा लभडे, इमरान कोतवाल यांच्या हस्ते तसेच नगरपरिषदेच्या सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या शिवरस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच सत्कार सोहळ्यात या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन नगरपरिषदेतर्फे देण्यात आले होते. पावसाळ्यात या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था होत असल्याने नागरिक, शेतकरी तसेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यानंतर परिसरातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून, वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्येष्ठ नेते विश्वासराव मोरे, रवींद्र मोरे, संदीप सुराणा, बापूसाहेब पाटील, मुख्याधिकारी श्रेया देवचक्के, राष्ट्रवादीचे गटनेते गणेश बनकर, महेश अहिरे, नगरसेविका कल्पना विधाते, सिंधूताई गांगुर्डे, मेघना पाटील, श्वेताताई मोरे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com