PML26B10091-- सिंगल
पिंपळगाव बसवंत ः नगरपरिषदेकडून उभारण्यात आलेले मूर्ती विक्री स्टाॅल
-----------
३०-२
निश्चित केलेल्या जागेवरच
गणेशमूर्ती स्टॉल लावावेत
--------
पिंपळगाव नगरपरिषदेचे विक्रेत्यांना आवाहन
----------
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.८ ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत नगरपरिषदेतर्फे गणपती मूर्ती विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले आहे. मूर्ती विक्रीसाठी रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी अनधिकृतपणे स्टॉल न लावता नगरपरिषदेने निश्चित करून दिलेल्या जुन्या मार्केट कमिटीच्या जागेवरच स्टॉल लावावेत, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ. मनोज बर्डे, उपनगराध्यक्ष सतीश मोरे, शिवसेना गटनेते नीलेश पाटील यांनी केले आहे.
---------------
गणपती स्टॉलसाठी नगरपरिषदेने उपलब्ध करून दिलेल्या जागेवरच स्टॉल उभारावेत. सार्वजनिक रस्ते, वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी अथवा परवानगी नसलेल्या जागेवर स्टॉल लावू नयेत, असे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे. सध्या जुन्या मार्केट कमिटीच्या जागेवर एकूण ४५ स्टॉल उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असून दोन दिवसात सर्व स्टॉल धारकांना येथे स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहे.
अनधिकृतपणे स्टॉल लावण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसेच दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे स्टॉलधारकांनी नियमांचे पालन करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे स्टॉल धारकांनी तात्काळ नगर परिषदेची संपर्क करणे गरजेचे आहेत.
--------