पिंपळगाव पोलिसांची धडक कारवाई वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश

पिंपळगाव पोलिसांची धडक कारवाई वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश
Published on
PML26B10093 पिंपळगाव बसवंत ः संशयित वाहनचोरांच्या टोळीला अटक करताना पोलिस निरीक्षक गणेश गुरव व पथक. ------------- दुचाकी चोरांच्या टोळीचा पर्दाफाश पिंपळगाव पोलिसांची कारवाई ः चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.८ : पिंपळगाव पोलिसांनी वाहनचोरीविरोधात धडक कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले, त्याची कसून चौकशी केली असता वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. संशयितांकडून चोरीच्या तब्बल पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे वाहनचोरीच्या प्रकरणांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे. पिंपळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गणेश भास्कर नेरकर, वैभव कडूबा वाकळे ( रा. मखमलाबाद, नाशिक) व राहुल विनोद शहा ( रा. ओझर) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयितांनी म्हसरूळ, गंगापूर आणि पिंपळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. १६-१ संशयितांकडून गुन्हा कबूल या कारवाईत संशयितांनी दुचाकी चोरीचा गुन्हा कबूल करत चोरीच्या पाच दुचाकीबाबत माहिती दिली, त्या पोलिसांना ताब्यात घेतल्या आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या दृष्टीने पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी, नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलिस अधीक्षक एम. विमला आणि उपविभागीय पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांच्या सूचनांनुसार पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसपथकाने ही कारवाई यशस्वी केली. या कारवाईत सहाय्यक निरीक्षक रोहिदास भोर, हेड कॉन्स्टेबल नीलेश जाधव, प्रशांत उगले, विकास गुंजाळ, सागर धात्रक, नितीन गाढवे, गोकूळ खैरनार यांनी सहभाग घेतला. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिसांची कारवाई अधिक वेगाने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com