पोळा विशेष
---------------
PML26B10095
पाचोरे वणी (ता.निफाड) ः हरण्या- वकिल्या बैलजोडीसमवेत आत्माराम वाटपाडे व कुटुबिय.
------------------
यांत्रिक युगातही बैलांशी नाळ कायम!
ट्रॅक्टरच्या वापरातही आत्माराम वाटपाडे सांभाळतात बैलजोडी
एस. डी. आहीरे ः सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.९ : यांत्रिकीकरणामुळे शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असले, तरी शेतकरी आणि बैलजोडीचे नाते आजही तितकेच जिव्हाळ्याचे आहे. नांगरणीपासून पेरणीपर्यंतची बैलांची जागा आता ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि विविध कृषी यंत्रांमुळे शेतीची कामे वेगाने होत असली, तरी बैलजोडी सांभाळत त्यांच्या माध्यमातून शेती कसरणारे शेतकरी आहेत.
पाचोरेवणी (ता.निफाड) येथील आत्माराम रामचंद्र वाटपाडे यांचे बैलावर विशेष प्रेम. पाच एकर शेती नांगरणीसह संपूर्ण मशागत ते हरण्या-वकिल्या बैलजोडीने करतात. पोटच्या मुलासारखे संगोपन करतात. बैलांना चारा, चंदी, मक्याचा भरडा, ढेप यासह सकस आहार दिला जातो. बैलजोडी केवळ शेतीचे साधन नसून कुटुंबातील सदस्याप्रमाणेच आहेत असे वाटपाडे अभिमानाने सांगतात.
तरुण शेतकरी बदलत्या काळाची गरज ओळखून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आहेत. मात्र बैलपोळा हा शेतकरी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे असे सांगत तरुण शेतकरी त्याचे महत्त्व कायम असल्याचे सांगतात.
---