पान-३
PML26B10105
पिंपळगाव बसवंत ः येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी शोभा बनकर व उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करताना भास्कर बनकर, तानाजी बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे आदी.
----------------------
पिंपळगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रथमच महिला
शोभा बनकरांना संधी ः उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरेही बिनविरोध, शतकमहोत्सवाकडे वाटचाल
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१० ः शतकमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या पिंपळगाव बसवंत विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यादाच महिलेला मिळाला आहे. शोभा दौलतराव बनकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. उपाध्यक्षपदी सोमनाथ मोरे यांची वर्णी लागली आहे.
चंद्रकांत बनकर व हिराबाई खोडे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कांतिलाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात दोन्ही पदासाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. सुमारे वीस कोटी रुपये वार्षिक कर्ज वाटप व जिल्ह्यात अव्वल असलेल्या पिंपळगाव सोसायटीत शोभा बनकर यांच्या कुटुंबाला तिसऱ्यांदा मानाचे पान मिळाले आहे. यापूर्वी त्यांचे पती (स्व) दौलतराव बनकर व सासरे पंढरीनाथ बनकर यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
ज्येष्ठ नेते भास्कर बनकर, तानाजी बनकर, दिलीप मोरे, चंद्रकांत खोडे, गणेश बनकर, संचालक चंद्रकांत बनकर, हिराबाई खोडे, सुरेश खोडे, राहुल बनकर, रामराव डेरे, अनिल बनकर, विजय देशमाने, दत्तात्रेय देवकर, आशिष बागूल, अशोक भवर, मोतीराम पवार, हर्षल जाधव, अशोक विधाते, केशव बनकर, कौस्तुभ तळेकर, राजेंद्र विधाते, विकास बनकर, रामराव बनकर, इकबाल शेख, बाळा बनकर, संतोष बनकर, विशाल मोरे, साहेबराव जाधव, बाळासाहेब विधाते, पुंडलिक बनकर, सचिव नितीन कर्डेल आदी उपस्थित होते.
---------
कोट
पती व सासरे यांच्यानंतर मला अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. शेतीत राबणाऱ्या महिलांचा हा सन्मान आहे. सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत ठेवणार आहे.
- शोभा बनकर, नवनिर्वाचित अध्यक्ष, पिंपळगाव सोसायटी.
-----------