PML26B10115
पिंपळगाव बसवंत ः येथे सोमवारी भक्तिभावात गणरायाला घरी घेऊन जाताना भाविक.
-----------
हा फोटो सिंगल फक्त आमदार घेणे
PML26B10117
पिंपळगाव बसवंत ः गणरायाची आरती करताना आमदार दिलीप बनकर.
--------------
द्राक्षनगरीत भक्तांच्या आनंदाला उधाण
ढोलताशांच्या गजरात स्वागत मिरवणुका ः शहरात मोरयाचा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
पिंपळगाव बसवंत, ता.१४ ः चराचरात चैतन्य निर्माण करणाऱ्या मंगलमय अन आनंद सोहळ्याला गणपतीच्या आगमनाने सुरवात झाली. लाडके दैवत, कलाबुद्धीची देवता गणरायाच्या स्वागताचा उत्साह द्राक्षनगरीत ओसंडून वाहिला. घरगुती व सार्वजनिक मंडळाच्या गणरायाचे आगमन होताना मोरयाचा एकच गजर पिंपळगाव बसवंतमध्ये झाला. वाजतगाजत बाप्पाच्या आगमनावेळी भक्ताचा आनंद शिगेला पोहचला.
सकल सृष्टीचे आराध्यदैवत असलेल्या श्रीगणेशाच्या स्वागतासाठी अवघ्या पिंपळगाव शहरात भक्तांच्या आनंदाला उधाण आले. घराघरांत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना, सार्वजनिक मंडळांचे आगमन सोहळे, ढोलताशांचा गजर, आकर्षक सजावट आणि रोषणाईच्या झगमगाटात मोरयाच्या जयघोषाने बारा दिवसाच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला.
निफाड फाटा परिसरातील बाजारपेठेत मोठा उत्साह दिसला. संपूर्ण शहर व परिसर भक्तीच्या वातावरणाने भारावले. गेली आठ दिवसापासून पिंपळगाव शहरात गणेशोत्सवाच्या तयारीने जोर धरला होता. निफाड फाटा व आठवडे बाजार मैदानात गणेशमूर्ती व सजावट, पुजेच्या साहित्य खरेदीला झुंबड उडाली. मखर, फुलांच्या माळा, लायटिंग, पुजेच्या सामुग्रीत धूप, अगरबत्ती, फुले, श्रीफळ आदीची खरेदीसाठी संपूर्ण कुटुंब आले होते.
१६-१
प्रमुख मंडळांच्या मिरवणुका
शहराढोलताशआंतील सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशाच्या गजरात स्वागत मिरवणुका काढल्या. यात बसवंत प्रतिष्ठान, आदर्श तरूण मंडळ, महात्मा फुले कृषी मंडळ, नॅशनल हायवे मित्र मंडळ, जनार्दन स्वामी मंडळ, साई नवयुवक मंडळांनी वाजतगाजत गणरायाची प्रतिष्ठापना केली. गणरायाच्या आगमनाने शहरात आनंद व उत्साहाला उधाण आले. पिंपळगाव शहरातील शैक्षणिक, शासकीय, सहकारी संस्थांमध्ये श्री विराजमान झाले.
-------------