पिंपळगांवलला गौराईचे सोनपावलांनी आगमन

पिंपळगांवलला गौराईचे सोनपावलांनी आगमन
Published on
PML26B10129 पिंपळगाव बसवंत ः येथे गुरुवारी माहेरवाशिण गौराईच्या स्वागताप्रसंगी महिला व केलेली आरास. ----------------- ३०-२ सोनपावलांनी गौराईचे घरोघरी झाले आगमन -------------- तीन दिवस माहेरी ः घरात सुख समृद्धीचे मानतात प्रतीक ------------ सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता.१७ ः तीन दिवसापूर्वी लाडक्या गणपतीपाठोपाठ गुरूवारी (ता.१७) शहरात घरोघरी लाडक्या गौराईचे आगमन झाले. सोनपावलानी गौराईची स्वारी घरी आल्याने महिलांच्या उत्साहाला उधाण आले. तीन दिवसांसाठी पाहुणी म्हणून आलेल्या गौराईच्या आगमनाचा आनंदोत्सव घरोघरी सुरू आहे. धनधान्य, ऐश्‍वर्य, समृध्दीची देवता म्हणून गौरीपूजन करण्याची परंपरा विविध कुटुंब श्रध्देने जपतात. आवाहन, पूजन व विसर्जन अशा पद्धतीने हा उत्सव साजरा करण्यात येतो. गौराईचे आगमन मोठ्या उत्साहात घरोघरी झाले. सोनपावलांनी आलेल्या गौरीची स्वारी घरात सुख, समृद्धी घेऊन आल्याचा प्रत्यय आला. गौराईच्या पाहुणचारात कोणतीही कसर राहू नये म्हणून महिलांची लगबग सुरू आहे. गौराईची सरबराई करण्यासाठी बाजारपेठेतून विविध वस्तूंची खरेदीसाठी बाजारपेठेत झुंबड उडाली होती. घराघरात गौराईच्या आकर्षक मुखवट्यांना विविध धातुच्या दागिन्यांनी सजावट करण्यात आली. ---------- गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन या तिन्ही विधिमध्ये स्वच्छता, सात्त्विकता आणि भक्तिभाव महत्वाचा आहे. कुलाचारानुसार पूजा करण्यास प्राधान्य दिले जाते. नैवेद्य, सवाष्ण पूजन आणि हळदी-कुंकवातून आनंद व समृद्धीची भावना दृढ होते. -ऋषिकेश जोशी, पिंपळगाव बसवंत (पुरोहित) -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com