एफएफएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

एफएफएस प्रणालीतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी
Published on
‘एफएफएस’ प्रणालीतील अडचणी दूर कराव्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे कृषी अधीक्षकांना साकडे सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. २० ः खत विक्रीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘एफएफएस’ प्रणालीत वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकरी तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या अडचणी दूर करून प्रणाली सुलभ करावी, अशी मागणी नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात खत विक्रीसंदर्भात भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले आहे. ‘एफएफएस’ पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर काही वेळातच सेशन बंद होत असल्याने पुन्हा लॉगिन करावे लागते. तसेच ते करताना आधार व ओटीपीची प्रक्रिया करावी लागत असल्याने विक्रेत्यांचा वेळ वाया जात असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांची बांधावरच खताची माहिती नोंदविणे, वाहनातून उतरविलेल्या खताच्या पोत्यांची नोंद, तसेच विविध कंपन्यांच्या खतांची उपलब्धता याबाबतही प्रणालीत अडचणी येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आधारकार्ड किंवा ओटीपी प्रक्रियेमुळे खत विक्रीत विलंब होत असून, प्रिंटर तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या समस्यांमुळेही विक्रेत्यांना अडथळे येत आहेत. ग्रामीण भागातील नेटवर्कच्या समस्येमुळे काही ठिकाणी ‘एफएफएस’ प्रणालीवर व्यवहार करणे शक्य होत नाही. अमोनियम सल्फेटसह काही खतांच्या विक्रीदरम्यान प्रणालीत दर व प्रमाणाबाबत अडचणी येत असल्याची तक्रार आहे. याशिवाय, पीकनिहाय खतांची मागणी, यूरिया व डीएपीच्या पुरवठ्याचे नियोजन, आयएफएमएस प्रणालीतील खरीप व रब्बी हंगामाच्या नोंदी तसेच अन्य सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. एफएफएस प्रणाली अधिक सुलभ, जलद आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून खत विक्री सुरळीत करावी, अशी मागणी नाशिक ॲग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अरुण मुळाणे, उपाध्यक्ष रामभाऊ माळोदे, सरचिटणीस यूवराज पाटील, खजिनदार ललित जाधव, मंगेश तांबट यांनी केली आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com