पावसाचा दगा,विजेच्या लंपडावाने शेतकरी त्रस्त

पावसाचा दगा,विजेच्या लंपडावाने शेतकरी त्रस्त
Published on
PML26B10180 म्हाळसाकोरे (ता. निफाड) ः विजेअभावी पाणी देता येत नसल्याने जळू लागलेले सोयाबीनचे पीक. --- अनियमित वीजपुरवठ्याने शेतकरी त्रस्त वीज नसल्याने पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्याना धडपड सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. २२ ः पावसाने पाठ फिरविल्याने आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या अडचणीत आता विजेच्या लंपडावाची भर पडली आहे. निफाड तालुक्यातील अनेक गावांत विशेषतः गोदाकाठ परिसरात कृषिपंपाचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होत आहे. काही ठिकाणी पाणी आहे; पण वीज नसल्याने पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्याना धडपड करावी लागत आहे. तसेच सर्पदंश, बिबट्याचे हल्ले होण्याच्या दुर्घटना घडत आहे. असे अभुतपूर्व संकट कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर ओढावले आहे. वीजप्रश्‍नावर लोकप्रतिनिधी आक्रमक झाले असले तरी महावितरण अपेक्षित प्रतिसाद देताना दिसत नाही. पावसाने महिन्याभरापासून उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. कृषिपंपासाठी होणारा वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके कोमजण्याची स्थिती असताना वीजपुरवठा सुरळीत होताना दिसत नाही. बागायती पिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. विजेअभावी शेतीचे कामे आणि सिंचनाचे नियोजन विस्कळित झाले आहे. निफाड तालुक्यात ३३ हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पीकपेरणी झाली आहे. त्यात सोयाबीन २१ हजार, तर मका ११ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. कृषिपंपासाठी आवश्‍यक असलेली थ्रीफेज वीज रात्री-पहाटे दिली जाते. त्यासाठी शेतकऱ्यांना रात्र जागून काढावी लागत आहे. --- कोट वीज भारनियमन वाढल्याने शेतकरी संकटात आहे. वीज अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्याचा सूचना त्यांना केल्या आहेत. - दिलीप बनकर, आमदार --- शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहे. वीज भारनियमन करून संबंधित यंत्रणेने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये. - गोकुळ गिते, आमदार --- भारनियमामुळे शेतकरी त्रस्त असल्याने वीज कार्यालयावर धडक मोर्चा काढला. येत्या चार दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास शिवसेना स्टाइलने झटका देऊ. - अनिल कदम, माजी आमदार --- पावसाचा तुटवडा व विजेचा लंपडावामुळे शेतकरी दुहेरी संकटात आहेत. खरीप हंगामातील पिकांचा हातातोडाशी आलेला घास वीजपुरवठ्याअभावी हिरावला जाण्याची भीती आहे. - विठोबा फडे, लालपाडी, शेतकरी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com