तनुजा हारक ः PNH26B07094
वृषाली दळवी PNH26B07092
------------------
२०-१
शिवड्याची तनुजा हारक
पांढुर्ली केंद्रामध्ये प्रथम
-------------
पांढुर्ली, ता.११ ः शिवडे येथील जनता विद्यालयाची तनुजा हारक ८७.६० टक्के गुण मिळवीत दहावीच्या परिक्षेत पांढुर्ली केंद्रात प्रथम आली. विंचूर दळवी येथील वृषाली दळवी हिने ८६.६० टक्के मिळवीत द्वितीय आली. या निकालात मुल़ींनी बाजी मारली आहे. विंचूरदळवी विद्यालयाचा सर्वाधिक ९०.५६ टक्के निकाल लागला.
पांढुर्ली जनता विद्यालयाचा निकाल ८५.५८ लागला. आदिती सचिन वाजे (८५.४०) प्रथम, धनश्री संतोष कानडी (८४) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापिका सुनीता जगताप यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शिवडे जनता विद्यालयाचा निकाल ८६.८४ टक्के लागला. तनुजा विठ्ठल हारक (८७.६०) प्रथम, चैताली रवींद्र हारक (८६.२०) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. मुख्याध्यापक बी. पी. पगारे व ज्येष्ठ शिक्षक महाले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विंचूरदळवी माध्यमिक विद्यालयात वृषाली युवराज दळवी (८६.६०) प्रथम, भावना कृष्णा गुळवे (८५.२४) द्वितीय आली. शाळेचा शेकडा निकाल ९०.५६% लागला. विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक बी. व्ही. पांडे यांनी अभिनंदन केले.
आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतनचा शेकडा निकाल ८७.५०% लागला. सिद्धेश शरद तुपे ( ७७.२०) प्रथम, नीता गजीराम बरकले (७५) द्वितीय आली. संस्थेच्या अध्यक्षा ललिता वीर व मुख्याध्यापक राणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
------------