ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून ‘हरित कुंभ • शाश्वत कुंभ’चा संदेश

ज्येष्ठ नागरिकांच्या सहभागातून ‘हरित कुंभ • शाश्वत कुंभ’चा संदेश
Published on
07484 देवळाली कॅम्प : ज्येष्ठांच्या पुढाकारातून पर्यावरणाचा जागर; ‘हरित कुंभ, शाश्वत कुंभ’चा संदेशाच्या पोस्टर्स समवेत ज्येष्ठ नागरिक. देवळाली कॅम्पमध्ये लोकसहभागातून ‘हरित कुंभ- शाश्वत कुंभ’चा संदेश सकाळ वृत्तसेवा देवळाली कॅम्प, ता.२२: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर ‘हरित कुंभ- शाश्वत कुंभ’ या संकल्पनेचा पर्यावरणपूरक संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी देवळाली कॅम्प शहरात जनजागृती करण्यात आली. शिवयुवा प्रतिष्ठान सार्वजनिक महिला गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांसह व्यापारी व दुकानदार वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेतला. ज्येष्ठ नागरिकांच्या हातात ‘प्लास्टिकमुक्त कुंभ’, ‘वृक्ष वाचवा – पर्यावरण वाचवा’, ‘स्वच्छता हीच सेवा’, ‘एक भाविक – एक संकल्प’ अशा विविध पर्यावरणपूरक संदेशांचे पोस्टर्स देण्यात आले. पोस्टर्सच्या माध्यमातून नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळणे, स्वच्छता राखणे, वृक्षसंवर्धन करणे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले. ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांची ऊर्जा यांचा संगम घडवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी शिवयुवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद मोजाड, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भिकाजी डांगे, तसेच जयराम झोंबाड, बाळासाहेब गावंडे, अशोक पवार, रघुनाथ मोंढे, पांडुरंग गिते, यशवंत वावरे, सुरेश जाधव, त्र्यंबक मेढे, विष्णू डांगे, गणपत शेलार आदींसह ज्येष्ठ नागरिक, व्यापारी व दुकानदार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. -------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com