PTH26B01885
पेठ ः नेपाळहून परतलेल्या पर्यटक तरूणांबरोबर पालक म मित्रमंडळी.
--------------
३०-२
नेपाळमध्ये फिरायला गेलेले
पेठचे अकरा तरूण परतले
--------------
सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता. १: नेपाळ येथे पर्यटनासाठी गेलेले आणि जलप्रलयानंतर तेथे अडकलेले पेठ शहरातील अकरा तरुण तब्बल १५ दिवसांच्या थरारक आणि अनुभवानंतर परतले आहेत. मुलांचे सुखरूप पुनरागमन झाल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
नेपाळमधील पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पेठ येथील अर्जुन शिंदे, रोहित शिंदे, विशाल शिंदे, रुपेश वाघे, अभिषेक पवार, आकाश कोतुळकर, ओम शिंदे, पियूष शिंदे, आयुष शिंदे, करण शिंदे आणि शुभम शिंदे हे अकरा मित्र नेपाळमध्ये गेले होते. मात्र, तेथे अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली. संपर्क यंत्रणा कोलमडली. साधने आणि वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने हे तरुण तेथेच अडकून पडले. शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद्माकर कामडी यांनी तातडीने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधून युवकांच्या सुरक्षेसाठी मदतीचे आवाहन केले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तात्काळ पुढाकार घेतला. त्यांनी संपर्क साधून नेपाळमधील स्थानिक प्रशासनाशी समन्वय प्रस्थापित केला आणि अकराही युवकांना काठमांडू येथील सुरक्षित ठिकाणी हलवले. काठमांडू येथून सर्व तरुणांना प्रथम रस्तेमार्गाने गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथे आणण्यात आले. त्यानंतर गोरखपूर येथून विमानाने त्यांना पुणे येथे आणले. रविवारी रात्री पुणे विमानतळावर हे तरुण दाखल झाले. तेथून पेठ येथे आले.
-------------