पान दोन
----------------
01889
सुरेश सूर्यवंशी
------------
शिक्षक दिन विशेष
-------------
दळणवळणांच्या समस्यांवर
मात करत आनंददायी अध्यापन
रखमाजी सुपारे : सकाळ वृत्तसेवा
पेठ, ता. ४ : अतिदुर्गम आणि आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या पेठ तालुक्यात भौगोलिक परिस्थिती आणि दळणवळणांच्या मर्यादांवर मात करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घोटविहीरा येथील उपक्रमशील शिक्षक सुरेश म्हाळू सुर्यवंशी यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे केवळ शाळेचे रूप पालटले नाही, तर परिसरातील शैक्षणिक व सामाजिक वातावरणात सकारात्मक बदल घडले आहे.
फक्त वर्गशिक्षकापुरते मर्यादित न राहता परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी विविध सामाजिक जनहितकारी उपक्रमांची मोट बांधली आहे. वृक्षारोपण संवर्धन करताना विविध शाळांच्या प्रांगणात वृक्षारोपण मोहीम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले आणि रोपांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. याबरोबरच घोटविहिरा, घोसाळी, पिंपळवटी, कावळ्याचा पाडा आणि मुरूमटी या पाच आदिवासी वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५०० कुटुंबांना दरवर्षी किराणा कीट वाटप करून गरीबांची दिवाळी गोड साजरी करता. गरजू व्यक्तींना शासकीय व खासगी पातळीवर आर्थिक मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. वरील ५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध देत परिसरातील १० वेगवेगळ्या शाळांना पाण्याच्या टाक्या दानशूरांकडून मिळवून देत शालेय मुलांसाठी वॉटर फिल्टरची व्यवस्था केली.
रचनावादी व आनंददायी शैक्षणिक प्रयोग
अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी सूर्यवंशी यांनी अध्यापनात रचनावादी व आनंददायी शैक्षणिक प्रयोग करून आधुनिकता व नावीन्यपूर्ण प्रयोगांची सांगड घातलीत गणितातील बेरीज, वजाबाकी यासारख्या अवघड संकल्पना शिकवताना प्रत्यक्ष वस्तूंचा व खेळांचा वापर केला, ज्यामुळे मुले सहजतेने गणित शिकतात. पारंपारिक शिक्षण पद्धतीला फाटा देत शैक्षणिक व्हिडिओ, आकर्षक डिजिटल चित्रे आणि विविध डिजिटल साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने अध्यापन केले जाते.