निलांजन ( शैनेश्वर )मंडळाच्या वतीने शनि जयंती निमित्त उत्सवाचे आयोजन

निलांजन ( शैनेश्वर )मंडळाच्या वतीने शनि जयंती निमित्त उत्सवाचे आयोजन
Published on
शनी जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम सातपूर : अशोकनगर येथील निलांजन (शनेश्वर) मित्रमंडळातर्फे शनी जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.१६) सकाळी ८.३० ते ११ या वेळेत मौले हॉल ते शनी मंदिर दरम्यान ज्योतीचे आगमन व भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता महाआरती होईल. तसेच दुपारी १२ ते २ या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महंत श्री महेशदासजी वैष्णव यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे तरी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Marathi News Esakal
www.esakal.com