लोगो : सकाळ बातमी परिणाम.
--
जाधव संकुलात
दूषित पाण्याचा शोध सुरू
सातपूर, ता. १७ : प्रभाग १० मधील जाधव संकुल परिसरात चार-पाच दिवसांपासून गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत होता. गणेशोत्सवाच्या काळातही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याने महिलांसह रहिवाशांनी महापालिका प्रशासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याबाबत ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासन अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे.
दूषित पाणी नेमके कुठून येत आहे, शोध घेण्यासाठी जुन्या पिण्याच्या पाइपलाइन आणि परिसरातील ड्रेनेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर प्रशासनाने अखेर हालचाली सुरू केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नागरिकांनी ‘सकाळ’चे आभार मानले आहे
--कोट
जाधव संकुल परिसरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणीपुरवठ्याची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
- समाधान देवरे, प्रभाग सभापती
--कोट
पाण्याला दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिन्या आणि ड्रेनेज लाइनचीही तपासणी होणे गरजेचे आहे.
इंदूबाई नागरे, नगरसेविका