सोनगीर परिसरात पावसाचे आगमन

सोनगीर परिसरात पावसाचे आगमन
Published on
सोनगीरसह परिसरात पावसाचे आगमन सोनगीर : सोनगीरसह परिसरात पावसाचे आगमन झाले. मात्र, अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने हिरमोड झाला. कडक ऊन व उकाड्यातून सुटका होण्यास मदत झाली असली, तरी केवळ अर्धा तास पावसामुळे शेती व विहिरीसाठी उपयोग नाही, अशी स्थिती आहे. सोमवारी (ता. २२) दुपारी पावणेदोनच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. मात्र, जोरदार पावसाची आवश्यकता असून, अधिक पावसासाठी प्रार्थना केली जात आहे. सोनगीरसह परिसरातील दापुरा, दापुरी, सरवड, देवभाने, सोंडले, सार्वे, वायपूर, चांदगड, पिंपरखेडे, कलमाडी आदी भागांत पावसाचे आगमन झाले. यंदा हवामान खात्याने कमी पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी उदास आहे. कापसाचे बियाणे यापूर्वीच खरेदी झाले आहे. दरम्यान, रविवारी (ता. २१) रात्रीही अत्यल्प प्रमाणात पाऊस झाला. लहान मुलांनी पहिल्या पावसात भिजण्याचा यथेच्छ आनंद घेतला. पेरणीसाठी दोन- तीन वेळा जोरदार पाऊस होण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com