शासकीय योजनांचा लाभ थेट दारी - आमदार भदाणे

शासकीय योजनांचा लाभ थेट दारी - आमदार भदाणे
Published on
(पान ४ ला मेन) SGR26B07493, SGR26B07494 सोनगीर : सेवा संकल्प अभियानाचे उद्‌घाटन करताना आमदार राम भदाणे. दुसऱ्या छायाचित्रात स्वच्छता अभियानात सहभागी मान्यवर. ---------- प्रश्‍न सोडविणे हाच ‘सेवा संकल्पा’चा उद्देश आमदार राम भदाणे : सोनगीरपासून अभियानाला प्रारंभ सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. १७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त सेवा संकल्प अभियानाची सुरुवात जिल्ह्यात सोनगीरपासून झाली असून, शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारी आणून त्यांच्या अडचणी सोडवणे या प्रमुख उद्देश आहे, असे प्रतिपादन आमदार राम भदाणे यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष रामकृण खलाणे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरती देवरे, प्रा.अरविंद जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रकल्प संचालक राजन पाटील, मुख्य लेखा वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी राजेश इंगळे, निशा जाधव, गटविकास अधिकारी गणेश चौधरी तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार राम भदाणे यांच्या हस्ते सोनगीर- कापडणे मार्गावरील अंगणवाडी क्रमांक- १६ चे लोकार्पण झाले. घरकूल लाभार्थीची भेट व घरोघरी दिवा कार्यक्रम झाला. सरपंच प्रशासक लखन ठेलारी, ग्रामपंचायत अधिकारी मेघश्याम बोरसे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, भाजपचे ज्ञानेश्वर चौधरी, मोतीलाल माळी, दंगल धनगर, अमित बागूल, सुनील बागूल, प्राचार्य के. बी. दुसाने, पराग देशमुख, राजेंद्र जाधव, आरिफ खॉ पठाण, शफियोद्दिन पठाण, भटू धनगर, धाकू बडगुजर, शहराध्यक्ष साहेबराव बिरारी आदींनी संयोजन सहकार्य केले. केदारेश्वर मोरे यांनी सूत्रसंचालन केले. आरिफ खॉ पठाण यांनी आभार मानले. ------- विविध दाखल्यांचे वाटप येथील ग्रामपंचायत व एन. जी. बागूल हायस्कूलतर्फे सेवा संकल्प अभियान शिबिर घेण्यात आले. त्यानिमित्त विद्यार्थीनींची आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, मानवी साखळीद्वारे भारताचा नकाशा, स्वच्छतेची शपथ आदी कार्यक्रम झाले. या वेळी ग्राम सफाई, वृक्षारोपण, चित्रकला स्पर्धा, महिला स्वयंसहायता बचतगट बांधणी, महिला बचतगटांना कर्जपुरवठाचा धनादेश वाटप, वक्त्तृत्व स्पर्धा, तसेच लखपती दीदी प्रमाणपत्र वाटप, ग्रामपंचायतीचे विविध दाखले वाटप आदी कार्यक्रम घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com