शिरपूर : मुलाकडून आई वडिलांचा खून

शिरपूर : मुलाकडून आई वडिलांचा खून
Published on
SHC26B12715 : गंगा महतो व रंजूदेवी महतो (मृत) --- SHC26B12714 : चंदन महतो संशयित --- SHC26B12716 मांडळ : शिवारातील घटनास्थळ. --- डोक्यात दगडी खलबत्ता घालून आई-वडिलांचा खून --- शिरपूरच्या मांडळ भागातील घटना; संशयित मुलाला अटक सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १५ : झोपेत असलेल्या आई-वडिलांच्या डोक्यात दगडी खलबत्ता टाकून मुलाने त्यांचा निर्घृण खून केला. ही घटना शुक्रवारी (ता. १५) शहराजवळील मांडळ येथील चंद्रमौळी सोसायटीत घडली. कामधंदा करीत नाही म्हणून वडिलांकडून वारंवार होणाऱ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. मृत दांपत्य आणि संशयित दरभंगा (बिहार) जिल्ह्यातील रहिवासी आहेत. गंगा महतो (वय ५०) आणि रंजूदेवी महतो (४२) अशी मृतांची नावे असून, संशयित चंदन महतो त्यांचा मुलगा आहे. २५ एप्रिलला दरभंगा येथे गंगा महतो यांच्या मुलीचा विवाह होता. विवाह आटोपून चंदन व त्याची पत्नी निधी कुमारी तीन दिवसांपूर्वी शिरपूरला परतले होते. गंगा महतो व त्यांची पत्नी शुक्रवारी सकाळी साडेअकराला घरी आले. जेवण करून दोघेही झोपले होते. दुपारी दोनला चंदन महतो याने दगडी खलबत्त्याने दोघांच्या डोक्यात वार केले. त्यांच्या किंकाळ्या ऐकल्यानंतर सून निधीकुमारी खोलीबाहेर आली. रक्ताच्या थारोळ्यातील सासू-सासऱ्यांचे मृतदेह पाहून तिने आरोळी ठोकली. ती ऐकून शेजारी धावत आले. त्यांनी तातडीने पोलिसांना सूचित केले. पोलिसांनी संशयिताला अटक केली. अपमानाचा बदला गंगा महतो करवंद (ता. शिरपूर) येथील सॅनस्टार कंपनीत कामगार पुरवठादार म्हणून कार्यरत होते. मुलगा चंदन त्यांना मदत करीत होता. मात्र, त्याच्या कामाविषयी ते नाराज होते. ‘तू काहीच कामाचा नाहीस, ऐतखाऊ आहेस’ असे म्हणून ते त्याचा पाणउतारा करीत होते. तीन वर्षांपूर्वी चंदनचा विवाह झाला. मात्र, त्याच्या पत्नीसमोरही गंगा महतो त्याचा वारंवार अवमान करीत होते. दरभंगा येथे बहिणीच्या विवाहादरम्यानही त्याचा वडिलांनी अपमान केला. त्यामुळे बिथरून जाऊन आपण दोघांचा खून केला, अशी माहिती चंदन महतो याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. निधीचा वाचला जीव घटनास्थळावरील दृश्य भयानक होते. महतो दांपत्याचे रक्त खोलीतून बाहेर येऊन जिन्यावरून खाली ओघळत होते. घटना घडली त्या वेळी निधीकुमारी लहान बाळासह आतल्या खोलीत होती. या घटनेने ती भेदरून गेली. जिवाच्या भीतीने तिने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. तेथून तिने आरोळी ठोकली. प्रसंगावधान राखल्याने तिच्यासह बाळाचाही जीव वाचला. मृतदेहाजवळ संशयिताचा ठिय्या आई-वडिलांचा खून केल्यानंतर चंदन महतो त्यांच्या मृतदेहाजवळ निश्चल बसून होता. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याने कोणताच पश्चात्ताप व्यक्त केला नाही. माझा वारंवार अपमान होत असल्यामुळे हे कृत्य केल्याचे तो पुनःपुन्हा सांगत होता. पोलिस उपअधीक्षक विश्‍वजित जाधव, निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, संदीप दरवडे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मांडळ शिवारातील महादेव मंदिरामागे असलेल्या चंद्रमौळी सोसायटीतील घटनास्थळाबाहेर स्थानिकांची मोठी गर्दी झाली होती. महतो कुटुंब राहत असलेले दुमजली घर राजस्थानी कुटुंबाच्या मालकीचे असल्याचे कळते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com