शिरपूर : भूमिपूजन बातमी

शिरपूर : भूमिपूजन बातमी
Published on
SHC26B12907 चांदपुरी (ता. शिरपूर) : देवमढीत भूमिपूजन करताना आमदार काशीराम पावरा, भरत पाटील आदी. --------- सामाजिक सभागृहाचे चांदपुरी येथे भूमिपूजन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २६ : चांदपुरी (ता. शिरपूर) येथे देवमढीत आमदार अमरीशभाई पटेल यांच्या निधीतून साकारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे उद्‌घाटन आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आमदार पावरा यांनी ग्रामीण भागातील विकासकामांना प्राधान्य देत आदिवासी बांधवांच्या सुविधा वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे सांगून समाजोपयोगी सुविधा निर्माण झाल्याने गावाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल, असे स्पष्ट केले. अर्जुन पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. लिलाचंद पाटील यांनी प्रास्ताविक केले. विखरण मंडळाचे भाजप अध्यक्ष भरत पाटील, झुमडू भिल, कैलास पाटील, विकास पाटील, ग्रामसेवक अनिल शिरसाठ, न्हानभाऊ भिल, लक्ष्मण भिल, नामदेव भिल आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com