शिरपूर : अपघात बातमी

शिरपूर : अपघात बातमी
Published on
SHC26B12933 शिरपूर : अपघातानंतर उपजिल्हा रुग्णालयात झालेली गर्दी. --- पिक-अप घसरून १५ मजूर जखमी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २२ : वाघाडी-बोराडी रस्त्यावर चांदसूर्या (ता. शिरपूर) गावाजवळ सोमवारी (ता. २२) सायंकाळी पाचला पिक-अप घसरल्याने अपघात होऊन १५ जण जखमी झाले. सर्व जखमी शेतमजूर असून, गधडदेव (ता. शिरपूर) येथील रहिवासी आहेत. त्यांपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात हलविले असून, उर्वरित जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिमझिम पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यामुळे हा अपघात झाल्याचे दिसून आले. गधडदेव येथील मजूर निंदणीसाठी अर्थे (ता. शिरपूर) शिवारात गेले होते. काम आटोपून ते गावी परत जात असताना, पाऊस सुरू होता. निसरड्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटून पिक-अप उलटून हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. जखमींमध्ये राधा शिवाज्या पावरा (वय १७), रेवा डेबा पावरा (३०), लक्ष्मी बापू पावरा (१६), अश्विन कालू पावरा (१६), रंजिता विश्वास पावरा (२०), पायल राजू पावरा (१८), अजित बन्सी पाडवी (३०), अंकिता आकाश पावरा (१०), कुसुम कालूसिंग पावरा (३२), निखिल मनसू पावरा (११), संगीता उमेश पावरा (२८), शेवलीबाई दिलीप पावरा (४८), संगीता रमेश पावरा (४०), प्रमिला ठाणसिंग पावरा (१८), निर्मला सुरेश भिल (५५, सर्व रा. गधडदेव) यांचा समावेश आहे. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील पावरा, डॉ. हिरेन पवार, डॉ. अनिल पाटील, डॉ़. महेंद्र साळुंखे यांनी जखमींवर उपचार केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com