SHC26B12942
शिरपूर : वीज कंपनीच्या अभियंत्यांना निवेदन देतांना मनसेचे पदाधिकारी.
---------
स्मार्ट मीटरचा संभ्रम दूर करा
मनसेचे अभियंत्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २४ : महावितरण कंपनीतर्फे ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यासंदर्भात धोरण निश्चिती नसल्यामुळे संभ्रम पसरला असून, त्याबाबत जनजागृती करुन स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
मनसेचे तालुकाध्यक्ष पूनमचंद मोरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. २४) महावितरण कार्यालयात अभियंता संदीप पवार यांना निवेदन देण्यात आले. स्मार्ट मीटर बसविण्याबाबत वीज ग्राहकांमध्ये भीती असून, वाढत्या वीजबिलांबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. ग्राहकांची संमती न घेता व पुरेशी माहिती न देता सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तत्काळ थांबवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. पवार यांनी स्मार्ट मीटरसंदर्भात समाज माध्यमांवर पसरवलेल्या संदेशाबाबत स्पष्टीकरण देऊन अफवा व गैरसमज निर्माण करणारे संदेश थांबविण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हाध्यक्ष राकेश चौधरी, मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक नक्षत्र पाटील, छोटू राजपूत, रजेसिंह कोळी, अविनाश ठाकूर आदी उपस्थित होते.