शिरपूर : फसवणूक बातमी

शिरपूर : फसवणूक बातमी
Published on
एटीएम कार्ड बदलून वृद्धाची फसवणूक सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २४ : शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात हातचलाखीने एटीएम कार्डची अदलाबदल करून वृद्धाच्या खात्यातून १७ हजार ३०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना मंगळवारी (ता. २३) दुपारी घडली. दीपक अमृत चौधरी (वय ६६, रा. पित्रेश्वर कॉलनी, शिरपूर) पेन्शनधारक आहेत. २३ जूनला दुपारी पावणेदोनला ते वरझडी रोड परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममध्ये रोकड नसल्याने व्यवहार झाला नाही. त्याच वेळी तिघांनी चौधरी यांच्याशी संवाद साधत त्यांचे लक्ष विचलित करीत एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल केली. त्यानंतर काही वेळातच चौधरी यांच्या मोबाईलवर खात्यातून अनुक्रमे १० हजार व सात हजार ३०० रुपये काढल्याचे संदेश प्राप्त झाले. त्यानंतर त्यांनी खात्याची शिल्लक तपासली असता, अवघे ३० रुपये शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी हातातील एटीएम कार्ड तपासले असता, त्यावर ‘राजेंद्र’ असे नाव आढळले. त्यामुळे एटीएम कार्डची अदलाबदल झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत जाऊन एटीएम कार्ड बंद करण्यासाठी अर्ज करून संशयितांचा परिसरात शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नाहीत. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार रवींद्र आखडमल तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com