शिरपूर : वृक्षारोपण व साहित्य वितरण बातमी

शिरपूर : वृक्षारोपण व साहित्य वितरण बातमी
Published on
SHC26B12956 शिरपूर : विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करताना माजी विद्यार्थी. ------------ माळी विद्यालयात वृक्षारोपण, शालेय साहित्याचे वितरण दिवंगत मित्राच्या स्मृतिप्रित्यर्थ उपक्रम सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २६ : येथील पांडू बापू माळी विद्यालयातील १९९८ च्या वर्गमित्रांनी आपल्या दिवंगत मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण करुन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण केले. विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा लिपीक निलेश गुजर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी वर्गमित्रांसह शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा उपक्रम सातत्याने राबवला होता. त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी शुक्रवारी (ता. २६) १९९८ च्या ५० वर्गमित्रांनी एकत्र येऊन शालेय परिसरातील वृक्षारोपण केले. गरजू विद्यार्थ्यांना अडीच हजार वह्या, पेन व कंपास असे साहित्य वितरित करण्यात आले. कै. गुजर यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. उपमुख्याध्यापिका जे. एस. सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव, एस. डी. माळी, एस. एस. धाकड, एन. एन. पाटील, प्रफुल मराठे, व्ही. पी. सोनवणे आदी उपस्थित होते. रोहित शेटे, हेमराज राजपूत, नरोत्तम धाकड, दीपक चौधरी, यशपाल राजपूत, रूपेश चव्हाण, शैलेन्द्र राजपूत, विजय चौधरी, उदय पाटील, योगेंद्र राऊळ, अमोल सोनवणे, राहुल वाडीले, सुजीत जाधव, पंकज राजपूत, हर्षदा पुराणिक, माधुरी पाटील, कोकीळा राजपूत, राकेश माळी, राकेश राजपूत, पंकज गुप्ता, कुणाल भावसार, रवींद्र माळी, राजश्री एडकी, भूपेंद्र जाधव आदींनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com