SHC26B13322
तऱ्हाडी (ता. शिरपूर) : गौरवार्थी शिक्षकांसोबत पदाधिकारी.
----------
पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे
तऱ्हाडीत २० शिक्षकांचा गौरव
शिरपूर, ता. ९ : तऱ्हाडी (ता. शिरपूर) येथील मराठा पाटील बहुउद्देशीय संस्थेतर्फे (कै.) अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षकदिनी २० शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
तऱ्हाडी येथील अण्णासाहेब साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर सायन्स कॉलेजमध्ये झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुभाष भामरे होते. संचालिका उज्वला भामरे, बँक ऑफ बडोदाचे शाखाधिकारी किसन कुमार खाटिंग, स्नेहल गावंडे, स्वप्निल पाटील, प्रशांत भामरे, केंद्रप्रमुख किशोर गाडी लोहार, माजी मुख्याध्यापक नंदलाल कश्यप, मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल नीता पाटील, दीपक पाटील, प्रा. संभाजी पाटील, प्रा. चंद्रकांत सोनार, कुलदीप वाडिले, राजश्री खरे, उमेश पवार, राकेश पाडवी, कुरेशी शेख सादिक, विजया पाटील, प्रा. श्याम पाटील, हिरामण धूम, कृष्णा शिंपी, प्रा. संगीता पाटील, प्रेमराज हिवराळे, बाबुराव पावरा, ईश्वर पाटील, नूरजहा शेख, भावना सोनार व तृप्ती बडगुजर या शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पाटील यांनी आभार मानले.