SHC26B13331
शिरपूर : सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढताना तहसीलदार.
--------
शिरपूरला ६८ ग्रामपंचायतींच्या
सरपंचपदाची आरक्षण सोडत
शिरपूर, ता. ९ : तालुक्यातील पेसा व्यतिरिक्त ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी सन २०२५- ३० या कालावधीकरिता आरक्षण सोडत सोमवारी (ता. ८) तहसील कार्यालयात काढण्यात आली.
तहसीलदार महेंद्र माळी, नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर उपस्थित होते. बालक कार्तिक कोळी याच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीद्वारे आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित करण्यात आले. एकूण ६८ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चार, अनुसूचित जमातीसाठी १४, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी १६, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३४ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या.
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी भोरटेक, रुदावली, अंतुर्ली व अर्थे बुद्रूक या ग्रामपंचायती निश्चित करण्यात आल्या. अनुसूचित जमाती प्रवर्गात धाळनेर, टेकवाडे, अर्थे खुर्द, होळ, वाघाडी, बभळाज, भावेर, भटाणे, विखरण बुद्रूक, अजनाड, गिधाडे, जापोरा, वनावल व टेंभे बुद्रूक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अहिल्यापूर, चांदपुरी, नवे भामपूर, सुभाषनगर, आढे, पिळोदे, साकवद, वरुळ, आमोदे, बलकुवे-मुखेड, बोरगाव, नांथे, मांजरोद, कळमसरे, कुवे व शिंगावे या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या.
उर्वरित सावळदे, भोरखेडा, लोंढरे, ताजपुरी, करवंद, उंटावद, अजंदे खुर्द, बाभूळदे, जवखेडा, गरताड, वाठोडे, तरडी, खर्दे पाथर्डे, घोडसगाव, दहिवद, भाटपुरा, मांडळ, खामखेडा प्र. था., असली तांडे, जुने भामपूर, कुरखळी, जातोडे, पिंपळे, सावेर गोदी, भरवाडे, तऱ्हाडी त. त., पिंप्री, जैतपूर, बाळदे, ऊपरपिंड, तोंदे, खर्दे व हिंगोणी बुद्रूक या ३४ ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.