(सेकंड मेन)
SHC26B13337
शिरपूर : महिला आरक्षणाची सोडत काढताना बालक कार्तिक कोळी. शेजारी प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर आदी.
----------
शिरपूर तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’!
आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट; तहसील कार्यालयात बैठक
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १० : तालुक्यातील पेसा व्यतिरिक्त असलेल्या ६८ ग्रामपंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार असल्याचे बुधवारी (ता. ९) आरक्षण सोडतीनंतर स्पष्ट झाले.
सन २०२५- २०३० या कालावधीसाठी सरपंच आरक्षण निश्चितीची विशेष सभा तहसील कार्यालयात पार पडली. प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी आणि नायब तहसीलदार श्रीमती पंकज मगर उपस्थित होते. कार्तिक कोळी या बालकाच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (नामाप्र) आणि सर्वसाधारण अशा चारही संवर्गातील आरक्षण जाहीर करण्यात आले.
प्रवर्ग निहाय आरक्षण असे :
अनुसूचित जाती (एकूण ४ पैकी २ महिला)
आरक्षित गावे : भोरटेक, रुदावली, अंतुर्ली, अर्थे बुद्रूक
महिलांसाठी राखीव : रुदावली, अंतुर्ली.
अनुसूचित जमाती (एकूण १४ पैकी ७ महिला)
आरक्षित गावे : थाळनेर, टेकवाडे, अर्थे खुर्द, होळ, वाघाडी, बभळाज, मांजर, भटाणे, विखरण बुद्रूक, अजनाड, गिधाडे, जापोरा, बनावल, टेंभे बुद्रूक.
महिलांसाठी राखीव : अजनाड, अर्थे खुर्द, गिधाडे, टेकवाडे, भटाणे, वाघाडी, बभळाज.
नागरिकांचा मागास प्रवर्ग (एकूण १६ पैकी ८ महिला)
आरक्षित गावे : अहिल्यापूर, चांदपूरी, नवे भामपूर, सुभाषनगर, आढे, पिळोदे, साकवद, वरुळ, आमोदा, बलकुवे- मुखेड, बोरगांव, नांथे, मांजरोद, कळमसरे, कुवे, शिंगावे.
महिलांसाठी राखीव : आढे, पिळोदे, कुवे, नांथे, बलकुवे- मुखेड, वरुळ, साकवद, आमोदा.
सर्वसाधारण (एकूण ३४ पैकी १७ महिला)
आरक्षित गावे : सावळदे, भोरखेडा, लोंढरे, ताजपुरी, करवंद, उंटावद, अजंदे खुर्द, बाभुळदे, जवखेडा, अजंदे बुद्रूक, गरताड, वाठोडे, तरडी, खर्दे खुर्द, पाथर्डे, घोडसगांव, दहिवद, भाटपुरा, मांडळ, खामखेडा प्र. था., असली तांडे, जुने भामपूर, कुरखळी, जातोडे, पिंपळे, सावेर गोदी, भरवाडे, तर्हाडी त.त., पिंप्री, जैतपूर, उप्परपिंड, खर्दे बुद्रूक, हिंगोणी बुद्रूक, बाळदे, तोंदे.
महिलांसाठी राखीव : पिंप्री, सावेर गोदी, जैतपूर, भोरखेडा, वाठोडे, सावळदे, उप्परपिंड, खर्डे बुद्रूक, तोंदे, हिंगोणी बुद्रूक, करवंद, खामखेडा प्र.था., गरताड, घोडसगांव, जवखेडा, जातोडे, मांडळ.