(पान ४ ला ॲंकर)
SHC26B13350
शिरपूर : यशस्वी तडजोडीनंतर दांपत्याचा सत्कार करतांना जिल्हा न्यायाधीश एम. जी. चव्हाण, न्यायाधीश श्रीमती एल. पी. धन्वे, न्यायाधीश पवन ढोरे, अॅड. शांताराम महाजन आदी.
---------
राष्ट्रीय लोकअदालतीत ७०४ प्रकरणांचा निपटारा
शिरपूरला एक कोटी ९१ लाखांची वसुली
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १५ : येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात शनिवारी (ता.१२) आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत एकूण ७०४ प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात येऊन एक कोटी ९१ लाख ८३ हजार ६३१ रुपयांची वसुली करण्यात आली.
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मोहन चव्हाण अध्यक्षस्थानी होते. वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश श्रीमती एल. पी. धन्वे, प्रथम वर्ग दिवाणी न्यायाधीश पवन ढोरे, शिरपूर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. शांताराम महाजन, उपाध्यक्ष अॅड. व्ही. बी. पाटील, गटविकास अधिकारी प्रदीप पवार उपस्थित होते.
न्यायाधीश मोहन चव्हाण म्हणाले, लोकअदालत ही पक्षकारांना परस्पर संमतीने वाद मिटविण्याची प्रभावी संधी देणारी व्यवस्था आहे. तडजोडीस पात्र असलेल्या प्रकरणांचा सामोपचाराने निपटारा होत असल्याने पक्षकारांना जलद न्याय मिळतो. त्यामुळे न्यायालयांवरील प्रलंबित प्रकरणांचा भार कमी करण्याबरोबरच पक्षकारांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याच्या दृष्टीनेही लोकअदालतीचे महत्त्व आहे. अॅड. महाजन यांनी सलोखा कायम ठेवण्यासाठी लोक अदालतींचा पर्याय अनुसरण्याचे आवाहन केले. अॅड. जयश्री पंचभाई यांनी प्रास्तविकात लोकअदालतींची पार्श्वभूमी व उपयुक्तता यांची माहिती दिली. अॅड. विशाल मेटकर यांनी सूत्रसंचलन करुन आभार मानले.
पॅनल सदस्य अॅड. प्रवीणसिंह पाटील, अॅड. जयश्री पंचभाई, अॅड. योगिता मोरे यांनी प्रकरणांच्या सुनावणी व तडजोड प्रक्रियेसाठी सहकार्य केले. सहायक अधीक्षक जी. एस. पांडव, लघुलेखक जी. ए. पाटील, के. एम. पाटील, एम. एम. मोरे, लिपिक आर. पी. कुंभार, आर. एस. कोळी, एल. वाय. सोनवणे, आर. बी. पाटील, यू. पी. जोशी, पी. आर. शेंडे, पी. सी. शुक्ल, व्ही. जे. पंचभाई, एस. के. बागूल, शिपाई बी. एस. पाटील, एम. बी. ठाकूर, एन. जी. सुतार यांनी संयोजन केले.
---------------
निपटारा झालेली प्रकरणे----------वसूल रक्कम अशी
मोटार अपघात २६-------------एक कोटी ४१ लाख ७२ हजार रूपये
बँकेसंदर्भातील वाद १८---------२६ लाख ७१ हजार ५०० रूपये
ग्रामपंचायत ६३०--------------नऊ लाख ८८ हजार २४९ रूपये
वैवाहिक वाद ३, दिवाणी दावे १२----नऊ लाख २६ हजार ३८२ रुपये
धनादेश अनादर ३ दावे-----------चार लाख १५ हजार रूपये
शिक्षाविषयक वाटाघाटी १२-------१० हजार ५०० रूपये