सावेरजवळ अपघाताता ४ ठार

सावेरजवळ अपघाताता ४ ठार
Published on
सावेरजवळ अपघातात चार ठार शिरपूर, ता. १४ : शिरपूर- चोपडा रस्त्यावर सावेर (ता. शिरपूर) येथील फाट्यावर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात चार जण ठार झाले. हा अपघात रविवारी (ता. १३) सायंकाळी सहाला सावेर फाट्यावर पेट्रोल पंपासमोर झाला होता. जखमींपैकी दोन जण उपजिल्हा रुग्णालयात, तर अन्य दोघे धुळे जिल्हा रुग्णालयात मरण पावले. सर्व मृत मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत. सावेर रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीला चोपड्याकडून शिरपूरकडे येणाऱ्या ट्रक (एचआर ५५, एटी १३५५) ने धडक दिली होती. या अपघातात चारही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले होते. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरेश रमेश भिलाला (वय २६, रा. बालिया, जि. खरगोन) याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू करण्यापूर्वीच लुमऱ्या लालसिंह अहिरवाल (भिलाला, वय २५, रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी) याचा मृत्यू झाला. इसराम कालू अहिरवाल (वय ४०, रा. बुद्रा) व महेश लालसिंह कनासे (वय ३०, रा. बालिया) यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच रात्री त्यांचा मृत्यू झाला. थाळनेर पोलिसांनी ट्रकचालकाला अटक करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com