SHC26B13362
खर्दे बुद्रूक : फिजिओथेरपी शिबिराचे उद्घाटन करताना आमदार अमरीशभाई पटेल, डॉ. अली इराणी, भूपेशभाई पटेल व पदाधिकारी.
-------
नियमित तपासणीतून आजारांचा धोका कमी
डॉ. इराणी : तपनभाई पटेल रुग्णालयात रूग्णांची फिजिओथेरपी तपासणी
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १७ : डॉ. इराणी यांनी आरोग्यात फिजिओथेरपीची भूमिका, नियमित व्यायाम, शरीराची हालचाल आणि आजारांपासून प्रतिबंधात्मक पद्धतीने स्वतःचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करुन दैनंदिन जीवनात योग्य शारीरिक हालचाल आणि वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास विविध आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, असे मत आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपिस्ट तथा भारतीय क्रिकेटपटूंचे मुख्य फिजिओ मार्गदर्शक डॉ. अली ईराणी यांनी व्यक्त केले.
जागतिक फिजिओथेरपी दिनासह माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खर्दे बुद्रूक (ता. शिरपूर) येथील तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर आणि अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय फिजिओथेरपी शिबिराच्या पहिल्या दिवशी १३६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
१५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर सुरू राहणार आहे. एस.व्ही.के.एम.चे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. (कै.) तपनभाई पटेल यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. एस.व्ही.के.एम.चे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, विश्वस्त जयश्रीबेन पटेल, कृतिबेन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुंबई येथील डॉ. मानसी भारतीया, डॉ. सबाहा थावेर, डॉ. सागर तबंदेह, डॉ. खदीज मेनाई, डॉ. मीनाम बेग, प्रकल्प संचालक जी. बी. गुजर, सीईओ डॉ. संतोष पवार आदी उपस्थित होते. अस्तित्व फाउंडेशनच्या समन्वयिका सोनिया भसीन यांनी प्रास्ताविक केले. योगेश्वर माळी यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली.
------
नागरिकांसाठी विशेष सुविधा
या विशेष शिबिरात नागरिकांसाठी नोंदणी शुल्क नसून आठपेक्षा अधिक तपासण्या केवळ ९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात वजन, उंची, बीएमआय व कंबरेचा घेर, रक्तदाब, नाडी व ऑक्सिजनची पातळी, दोन मिनिटांचा वॉक टेस्ट, हृदयाच्या फिटनेसची तपासणी, बॅलन्स व चालण्याच्या गतीची तपासणीसह स्नायूंच्या ताकदीचे मूल्यांकन, मेंदू व नर्व्हस सिस्टिमची क्विक स्क्रीनिंग आणि तोल जाण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. शिबिरासाठी दूरध्वनी क्रमांक (०२५६३) ३५१५०३ व टोल फ्री क्रमांक १८०० ८९०९ १११ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.