SHC26B13366
शिरपूर : तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देतांना अनुभव युवा मंच व बिरसा आर्मीचे पदाधिकारी.
-----------
सार्वजनिक वितरण प्रणाली पारदर्शक करा
अनुभव युवा मंच, बिरसा आर्मीचे तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १७ : तालुक्यातील सार्वजनिक वितरण प्रणालीत विविध समस्या निर्माण झाल्या असून, त्यांचे तातडीने निराकरण करुन पारदर्शक व सुरळीत कारभार करावा, अशी मागणी येथील अनुभव युवा मंच व बिरसा आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली.
येथील तहसीलदार महेंद्र माळी यांची बुधवारी (ता. १७) पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. रेशन दुकानातून नियमित, योग्य प्रमाणात व वेळेवर धान्य मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. मात्र, वितरण व्यवस्थेत विविध अडथळे निर्माण झाले आहेत. शिधापत्रिकाधारकांना वेळेत धान्य मिळावे, लाभार्थ्यांच्या युनिटप्रमाणे धान्याचे वितरण करण्यात यावे, प्रत्येक व्यवहाराची पावती देण्यात यावी, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी मागणी अनुभव युवा मंचचे तालुकाध्यक्ष चेतन जाधव, बिरसा आर्मीचे मनोज पावरा, योगेश पावरा, दीपक पावरा, रामेश्वर पावरा, किशोर राठोड, कैलास पावरा, यशवंत पावरा, करणसिंह बंजारा, मुकेश पावरा, करण पावरा, जयकिसन पावरा आदींनी केली.