शिरपूर : अभियंता दिन बातमी

शिरपूर : अभियंता दिन बातमी
Published on
SHC26B13384 दहिवद (ता. शिरपूर) : अभियंता दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्राचार्य डॉ. नितीन पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी. -------- अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी बाळगावी प्राचार्य डॉ. नितीन पाटील : एसव्हीकेएम अभियांत्रिकीत अभियंता दिन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २० : देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. विविध क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये समाजाला सुखावह होतील, असे बदल अभियंत्यांनी घडवणे अपेक्षित आहे. त्यामुळे कर्तव्य बजावतांना अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासायलाच हवी, असे आवाहन प्राचार्य डॉ. नितीन पाटील यांनी केले. दहिवद (ता. शिरपूर) येथील एसव्हीकेएम अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विभागप्रमुख, प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. द्वितीय वर्ष व तृतीय वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या प्राध्यापकांबद्दल आदर व्यक्त करून त्यांचा सत्कार केला. या निमित्ताने विद्यार्थ्यांतर्फे टीसर्च एस्केप २०२६ या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सहभागींची विचार शक्ती, समस्या सोडविण्याच्या पद्धती, कल्पकता, आणि कौशल्य विकासात्मक तीन फेर्‍यांची रचना केली होती. एकूण ३० संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. अभियंत्यांची देशाच्या विकासातील भूमिका, आधुनिक तंत्रज्ञानातील बदल, नवोपक्रम, संशोधन तसेच अभियांत्रिकी शिक्षणातून विद्यार्थ्यांनी समाजाच्या गरजा ओळखून नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याचे महत्त्व याबाबत प्राध्यापकांनी मार्गदर्शन केले. स्टार्क्स टेक्निकल कोडिंग क्लबच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. प्रा. विशाल जगताप व सहकऱ्यांनी संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com