(पट्टा)
SKD26B04211
शिंदखेडा : दीपक पवार यांच्यासोबत मयूर भामरे, युवराज माळी.
--------------
तलावात अडकलेल्या
व्यक्तीला जीवदान
शिंदखेडा : मानसिक अस्वस्थतेच्या अवस्थेत चोपडा येथून भडणे परिसरात आलेल्या ४५ वर्षीय व्यक्तीला तलावाच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढून पोलिस व ग्रामस्थांनी त्यांना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविले. दीपक पंडित पवार (रा. चांभारवाडा, चोपडा) असे संबंधित व्यक्तीचे नाव आहे. रक्षाबंधनानिमित्त पवार हे सुरत येथे बहिणीकडे गेले होते. परतीच्या प्रवासात अनावधानाने रेल्वेतून उतरल्याने ते भडणे गाव परिसरात आले. अस्वस्थतेमुळे त्यांना पुढील मार्ग समजत नव्हता. अखेर ते गावालगतच्या तलावात जाऊन राहिले. बुधवारी (ता. २) सायंकाळी पाचच्या सुमारास काही शेतकऱ्यांना तलावात अनोळखी व्यक्ती दिसली. ४ सप्टेंबरच्या सकाळी शेतकरी शेतात गेले असता तलावाच्या दिशेने मदतीसाठी आरडाओरड ऐकू आली. जवळ जाऊन पाहिले असता दीपक पवार हे पाण्यात अडकलेले दिसले. शेतकरी कपूरचंद पाटील यांनी तत्काळ पोलिस पाटील युवराज माळी यांच्याशी संपर्क साधला. माळी यांनी बारकू माळी यांच्या मदतीने दोराच्या साहाय्याने तलावात उतरून पवार यांना सुखरूप बाहेर काढले. घटनेची माहिती सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांना देण्यात आली. पोलिसांनी पवार यांना नवीन कपडे, चप्पल व जेवण देऊन त्यांच्याशी संवाद साधला.