SKD26B04236
शिंदखेडा : घरकुल लाभार्थ्यांना जप्त वाळूचे वाटप करताना महसूल विभागाचे अधिकारी.
---------
जप्त पाच ब्रास वाळूचे
घरकुल लाभार्थ्यांना वाटप
शिंदखेडा, ता. १० : महसूल विभागाने जप्त केलेल्या पाच ब्रास बेवारस वाळूसाठ्याचे घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनंतर महसूल विभागाने शिंदखेडा शिवारात कारवाई करून बेवारस वाळूचा साठा जप्त केला होता. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील घरकुल लाभार्थ्यांची वाळूची गरज लक्षात घेऊन या जप्त वाळूचे नियोजनबद्ध वाटप केले.
यामध्ये सायजाबाई उदा भिल (साबरहट्टी) यांना दोन ब्रास, भुपेंद्र नामदेव कोळी (साबरहट्टी) यांना एक ब्रास, नामदेव भुरसिंग भिल (बंगला भिलाटी) यांना एक ब्रास, तर सायसिंग न्हानभाऊ भिल (वरपाडा रोड, बंगला भिलाटी) यांना एक ब्रास वाळू देण्यात आली. घरकुल उभारणीसाठी आवश्यक असलेली वाळू मोफत मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. जप्त वाळूचा योग्य पद्धतीने वापर करून गरजू घरकुल लाभार्थ्यांना मदत केल्याने महसूल प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.