शिंदखेडा तालुका कोरडादुष्काळग्रस्त जाहीर करा

शिंदखेडा तालुका कोरडादुष्काळग्रस्त जाहीर करा
Published on
SKD26B04241 शिंदखेडा : नायब तहसीलदार शारदा बागले यांना निवेदन देताना काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, प्रमोद सिसोदे, दीपक अहिरे आदी. -------- शिंदखेडा तालुका कोरडादुष्काळग्रस्त जाहीर करा हेक्टरी ७५ हजारांची मदत देण्याची काँग्रेसची मागणी सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १२ : तालुक्यात ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने खरीप पिकांना पाण्याचा ताण बसला आहे. कापूस, मका यासह विविध पिके ऐन भरण्याच्या अवस्थेत असताना पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिंदखेडा तालुका तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला हेक्टरी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिंदखेडा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार शारदा बागले यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी, प्रमोद शिसोदे, दीपक अहिरे, डॉ. जे. पी. बोरसे, राहुल माणिक, प्रसाद गीते आदी काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी पेरणीपासून बियाणे, खते, औषधे, मशागत, फवारणी व मजुरीवर मोठा खर्च केला आहे. कर्ज काढून उभे केलेले पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने केवळ पंचनामे व बैठका न घेता प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करून तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कापूस, मका व अन्य खरीप पिकांचे तातडीने प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे करावेत, पीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट कर्जमाफी करावी व कर्जवसुलीला स्थगिती द्यावी, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, नवीन स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती थांबवावी आणि शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा पुरेसा व नियमित वीजपुरवठा करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com