गणेशोत्सवात डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या- उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील

गणेशोत्सवात डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या- उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील
Published on
SKD26B04247 शिंदखेडा : शांतता समितीच्या बैठकीत बोलताना उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील. ---------- गणेशोत्सवात डीजेला फाटा द्यावा सुधीर पाटील : शिंदखेड्यात पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १५ : गणेशोत्सव काळात सामाजिक सलोखा कायम ठेवत समाजप्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करावे, डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्ये, ढोल- ताशा व वाजंत्रीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांनी केले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गणेश मंडळांनी समाजप्रबोधन करणारे देखावे उभारावेत. आदर्श मिरवणूक व आदर्श देखावे असल्यास बक्षिसे देण्यात येणार आहेत. सोशल मीडियाचा जपून वापर करावा. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. सहाय्यक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांनी गणेश मंडळांनी शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना दिल्या. शिंदखेडा शहराची ओळख एकोपा टिकवून ठेवणारे शहर अशी आहे. हा एकोपा कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ‘ठिणगी विझवणे सोपे आहे, वणवा होऊ देऊ नका,’ असे सांगत त्यांनी अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले. तालुका काँग्रेस अध्यक्ष सुनील चौधरी, प्रा. निरंजन वेंदे, प्रकाश चौधरी व प्रा. मधुकर मंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीस नायब तहसीलदार शारदा बागले, बांधकाम विभागाचे श्री. गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय पवार, नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, चंद्रकांत गोदवाणी, नगरसेवक मनोहर पाटील, सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर संकट, सुभाष माळी, अरुण देसले, तालुक्यातील पोलिस पाटील, शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com