SKD26B04272
शिंदखेडा : रक्तदान करताना रक्तदाते सोबत हस्ती बँक शिंदखेडा शाखेचे चेअरमन जितेंद्र पाटील, अनिल वानखेडे आदी पदाधिकारी.
---------
हस्ती बँकेच्या वर्धापनदिनी
मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबीर
रुग्णांची नेत्रतपासणी; ४१ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. २० : हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक (मल्टीस्टेट)च्या शिंदखेडा शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. १७) मोफत मोतीबिंदू तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने झालेल्या नेत्रतपासणी शिबिरात २१० गरीब व गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संबंधित रुग्णांवर रुग्णालयात लेन्स बसवून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांचा प्रवास, निवास, चहा-नाश्ता, भोजन, औषधे व काळा चष्मा आदी सुविधाही मोफत देण्यात येणार आहेत. शिबिराचे उद्घाटन उज्वला गिरीश टाटिया यांच्या हस्ते झाले. डॉ. तुषार देवरे व त्यांच्या पथकाने सहकार्य केले.
मनीषा जितेंद्र पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. या वेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनील चौधरी व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजाही झाली. बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन मदन जैन व किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, अनिल वानखेडे, हितेंद्र जैन, ॲड. अशोक गुजराथी, मनोहर भोजवानी, गिरीश टाटिया, शाखा व्यवस्थापक राहुल मराठे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.