पशुधन चोरणारी टोळी गजाआड

पशुधन चोरणारी टोळी गजाआड
Published on
पशुधन चोरणारी टोळी गजाआड गुन्हे शाखेची कारवाई; सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा साक्री, ता. २३ : साक्री व पिंपळनेर परिसरातून शेतकऱ्यांच्या म्हशी चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. या कारवाईत ९ म्हशी, २ पारडू आणि गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १५ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामुळे पशुधन चोरीचे तीन आणि वाहन चोरीचा एक, असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. साक्री-पिंपळनेर भागात पशुधन चोरीच्या घटना वाढल्याने पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी तपासाचे आदेश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक ज्ञानेश्‍वर वारे यांच्या पथकाने तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे सुरेश ऊर्फ सुऱ्या रमेश गावित (वय ३२, रा. सारवट, नवापूर) याला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने टाटा आरएक्स वाहनाद्वारे म्हशी चोरल्याची कबुली दिली. या टोळीचे आंतरजिल्हा रॅकेट असून आरोपींवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत. सध्या या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. -- फोटो - 02668 साक्री ः येथे पशुधन चोरणाऱ्या संशयितासह पोलिस अधिकारी आणि कर्मचारी. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com