06864 (क्रॉप करणे)
सटाणा : पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना ‘शंभूगौरव’ पुस्तक भेट देताना फाऊंडेशनचे अध्यक्ष वैभव सोनवणे.
वाचन संस्कृतीसाठी
संभाजी फाउंडेशनचा पुढाकार
सटाणा : ता.१५ : धर्मरक्षण, राष्ट्रनिष्ठा आणि अद्वितीय शौर्याची प्रेरणा देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सटाण्यात संभाजी फाउंडेशनच्या वतीने पुस्तक भेट उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्ञान, विचार आणि इतिहास जपण्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून विविध क्षेत्रातील लोकसेवकांना पुस्तके भेट देत वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे केवळ पराक्रमापुरते मर्यादित नसून विद्वत्ता, अभ्यासू वृत्ती आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, युवकांमध्ये इतिहासाविषयी अभिमान निर्माण व्हावा आणि समाजात वाचन संस्कृती अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे अध्यक्ष वैभव सोनवणे यांनी सांगितले. याप्रसंगी बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे, नायब तहसीलदार सचिन मारके पालिकेच्या मुख्याधिकारी ज्योती भगत-पाटील, पोलिस निरीक्षक योगेश पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, पालिकेतील शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक राहुल पाटील, निवृत्त मुख्याध्यापक विनायक बच्छाव तसेच रोटरीचे माजी प्रांतपाल प्रदीप बच्छाव यांना पुस्तके भेट देण्यात आले.