बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव
Published on
छायाचित्र- 07266 सटाणा : बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देताना माजी आमदार संजय चव्हाण, केशव मांडवडे, भारत काटके, मनोज सोनवणे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी. बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा तहसीलदारांना घेराव सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १६ : अत्यल्प पावसामुळे बागलाण तालुक्यात खरिपासह फळबागांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने पंचनाम्यांचे आदेश देऊनही महसूल प्रशासनाने कार्यवाही सुरू केली नसल्याचा आरोप करीत माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने बुधवारी (ता. १६) तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घातला. सरसकट पंचनामे करून शासनाला तातडीने अहवाल पाठवावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनह बागलाणमध्ये पंचनाम्यांना सुरुवात झालेली नाही. त्यामुळे संतप्त पदाधिकारी व शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. माजी आमदार चव्हाण म्हणाले, की संपूर्ण पावसाळ्यात तालुक्यात चार ते पाच दिवसच पाऊस झाला. पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकांची वाढ खुंटली असून, कांदा, मका, डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू व ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. उत्पादन घटण्याच्या शक्यतेने त्यांचे नियोजन कोलमडले असून, शेतमजूर व व्यावसायिकांवरही परिणाम झाला आहे. १२ सप्टेंबरनंतर चांगल्या पावसाची अपेक्षा होती; मात्र पाऊस न झाल्याने चिंता वाढली आहे. महावितरणचा वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा व जळालेले ट्रान्स्फॉर्मर यामुळे सिंचन व्यवस्थेलाही फटका बसत असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पीकविमा रक्कम तातडीने वितरित करावी, सरसकट पंचनामे करून अहवाल पाठवावा आणि दुष्काळसदृश परिस्थितीतील सर्व लाभ शेतकऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून प्रत्यक्ष शेतशिवारात पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त क्षेत्राची अचूक नोंद घ्यावी. पात्र शेतकऱ्यांना कोणत्याही मदतीपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी केली. पंचनाम्यात विलंब झाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान अधिक गंभीर होईल, असा इशाराही देण्यात आला. तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, कार्याध्यक्ष संजय पवार, शहराध्यक्ष भारत काटके, शहर कार्याध्यक्ष मनोज छोटू सोनवणे, साहेबराव सोनवणे, माजी सरपंच राजेंद्र जाधव, चेतन वणीस, विनोद पाटील, मयूर अहिरे, विलास सोनवणे, किरण पाटील, टोनी मोरे, सागर मोरे, स्वप्नील सोनवणे, पोपटराव सोनवणे, विकी महाजन, पोपटराव अहिरे, सुभाष पाटील, काळु जाधव, दीपक रौंदळ, केदा सोनवणे, वसंत सोनवणे, राजेंद्र सोनवणे, आनंदा सोनवणे आदी उपस्थित होते. ........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com