कळवणच्या बतामीच चौकट घ्यावा
‘घरगुती पर्यावरणपूरक
गणेशोत्सवात सहभागी व्हा’
सटाणा ः नगर परिषदेतर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी केले.
नगराध्यक्षा पाटील यांनी ‘स्वच्छ, सुंदर, संस्कारी व पर्यावरणपूरक सटाणा’ ही संकल्पना बळकट होण्यासाठी पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ आयोजित केली असल्याचे सांगितले.
स्पर्धेत शाडूची मूर्ती, नैसर्गिक सजावट आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना भाग घेता येईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्याकडून ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे यांच्याकडून सात हजार, तर तृतीय क्रमांकासाठी शिक्षण सभापती चेतन अशोक मोरे यांच्याकडून पाच हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
नागरिकांनी आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा व्हिडिओ तयार करून ९६६५६१५२७७ या क्रमांकावर पाठवावा. परीक्षण समितीच्या निर्णयानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे, शिवसेना गटनेता राहुल पाटील, भाजपचे गटनेता चेतन रौंदळ, मनीषा पवार आदी उपस्थित होते.