खरातच्या जमिनीच्या व्यवहारांचे पैसे बनावट खात्यात पँन, आधार शिवाय जगदंबा पतसंस्थेतून आठ लाखावर रकमांचे व्यवहार

खरातच्या जमिनीच्या व्यवहारांचे पैसे बनावट खात्यात पँन, आधार शिवाय जगदंबा पतसंस्थेतून आठ लाखावर रकमांचे व्यवहार
Published on
पॅन, आधारशिवाय ‘जगदंबा’ पतसंस्थेतून व्यवहार --- अध्यक्ष नामकर्ण आवारे यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १४ : भोंदू अशोक खरात याच्या जमिनीतील व्यवहारांचे पैसे जगदंबा माता पतसंस्थेच्या बनावट खात्यात टाकण्यात आले. पॅन व आधारशिवाय नियमबाह्य व्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, याची सखोल चौकशी करण्यासाठी पतसंस्थेचा अध्यक्ष असलेल्या नामकर्ण आवारे यास न्यायाधीश वाडीकर यांनी सोमवार (ता. १८)पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जगदंबा माता पतसंस्थेतील ३२ खाती बनावट असल्याचे उघडकीस आल्यावर खरात याच्यासह आवारे, व्यवस्थापक अविनाश कांडेकर व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सिन्नर पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. खरात याने जमिनीच्या व्यवहारातील पैसे पतसंस्थांत वळविल्याचे आता समोर येत आहे. या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी सिन्नर पोलिसांनी आवारे यास सात दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी केली. तथापि, न्यायालयाने पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. या बनावट खात्यातील व्यवहारांसाठी व्यवस्थापक कांडेकर याच्यावर कोणाचा दबाव होता, संचालक मंडळातील अजून कोणी सहभागी आहेत काय, खरातच्या व्यवहारांबाबत आवारे यास काय माहिती आहे, बनावट खाते कोणाच्या आशीर्वादाने उघडले गेले, याचा तपास करावयाचा असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. पतसंस्थेतून एका वेळेस दोन लाख रुपयांहून अधिक रक्कम काढण्यासाठी पॅन व आधार घेण्याबरोबरच लेखी अर्ज घेतला जातो. तथापि, अनेकदा आठ लाख रुपयांवर अधिक रकमेचे व्यवहार झाले असूनही लेखी अर्ज घेतले नाहीत. पॅन व आधारची मागणी केली नाही. हे व्यवहार संशयास्पद असल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. शिवनिका ट्रस्टबाबतही चौकशी आवारे हा शिवनिका संस्थानचा सचिव होता. या काळात शिवनिका संस्थानला येणारा निधी व इतर संशयास्पद बाबींचीही चौकशीही आवारे याच्याकडे करण्यात येईल. चौकशी काळात खरात व आवारे या दोघांना समोरासमोर बसवूनही पोलिस चौकशी करणार आहेत. खरातने समता पतसंस्थेत आवारेच्या नावे ठेवल्या ठेवी समता पतसंस्थेत आवारे कुटुंबीयांच्या नावावर ठेवी आहेत. या ठेवी खरात यानेच बनावट खाते उघडून ठेवल्या आहेत. या प्रकरणात आवारे साक्षीदार आहे. जगदंबा पतसंस्थेतील बेनामी व्यवहारांत प्रत्यक्ष व्यवहार करणारा प्रथम गुन्हेगार असल्याचा दावा आवारे याचे वकील राहुल कासलीवाल, विनोबा गोळेसर, शिवराज नवले यांनी केला. SNR26B20976 सिन्नर : भोंदू अशोक खरात प्रकरणातील नामकर्ण आवारे यास गुरुवारी न्यायालयात नेताना सिन्नर पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com