SNR26B20978
सिन्नर ः अयोध्या ते पशुपतिनाथ हे अंतर विश्वविक्रमी वेळेत धावून पूर्ण करणाऱ्या आदिती मुदगुल, श्रेया उगलमुगले.
----------------
सिन्नरच्या लेकींचा विश्वविक्रम
--------
अयोध्या ते काठमांडू अंतर धावून केले पूर्ण
------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १४ ः येथील दोन मुलींनी अयोध्या ते पशुपतिनाथ (काठमांडू, नेपाळ) हे ६७७ किलोमीटर अंतर सात दिवस पंधरा तास इतक्या विक्रमी वेळेत धावून पूर्ण केले. या विश्वविक्रमाचे तालुक्यातून स्वागत केले जात आहे.
मातोश्री निर्मला गोपाळ कुलकर्णी विद्यालयाची आदिती संदीप मुदगल (१४), नवजीवन डे स्कूलची श्रेया सुनील उगलमुगले (१३) या मुलींनी हा विश्वविक्रम केला. काश्मीर ते कन्याकुमारी अंतर विश्वक्रमी वेळेत धावून पूर्ण करणारे अभिजित भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दोघींनी ही कामगिरी केली. आदित्य तोडमल, सुनील उगलमुगले, संदीप मुद्गगुल यांचे सहकार्य लाभले. या दोघींच्या विक्रमाची गिनीच बुक रेकाँर्ड व आंतरराष्ट्रीय बुक आँफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे. ५ मे पासून त्यांनी अयोद्या येथील राम मंदिरापासून धावण्यास सुरुवात केली होती. १२ मेला दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी पशुपतिनाथ येथे पोचून हे अंतर पूर्ण केले. उष्णता, नेपाळमधील उंच डोंगर दऱ्यातून धावताना अनेक अडचणींचा सामना दोघींना करावा लागला. तथापि, जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा विक्रम केला. दररोज ८० ते ९५ किलोमीटर धावण्याचे सातत्य त्यांनी ठेवले होते. या विक्रमामुळे सिन्नरच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.
--------------