SNR26B20983
सोमठाणे ः कृषि महाविद्यालयाचा ‘रावे’ उपक्रम राबविण्यासाठी बांधावर जावून माहिती घेताना कर्मयोगी पाटील कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी.
------------------
कृषि दूतांकडून
‘रावे’ची माहिती
सिन्नर ः चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीदूतांकडून पीक पध्दतीसह खते, उत्पन्न वाढीच्या उपाययोजनांचा ‘रावे’ उपक्रमांतर्गत आधुनिक शेती व ग्रामीण विकासाची माहिती घेण्यात आली. प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे, उपक्रम समन्वयक प्रा. एस. बी. सातपुते, डॉ. एस. डी. आहेर. प्रा. आर. डी. दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष जगताप, कृष्णा मेधने, सार्थक कडलक, ऋषिकेश जाधव, राज गुप्ता, यश कानडे हे सहभागी झाले आहेत. तीन महिने गावात राहून शेतकऱ्यांशी तेट संवाद साधून उपक्रम राबविला जाणार आहे. भौगोलिक स्थिती, जलस्त्रोत, पीकपध्दती, अडचणी, पिकांवर येणारे रोग, उपाय योजना, आधुनिक यंत्राचा वापर, उत्पन्न वाढीचे उपाय आदींचा आढावा घेण्यात येणार आहे. बदलत्या आव्हानांवरही चर्चासत्र होणार आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारित बियाणे, संतुलित खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण, सेंद्रिय शेती तसेच प्रक्रिया उद्योगांची माहिती प्रात्यक्षिकांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत.
-----------