पान-२ मेन करणे
------
SNR26B20986
सिन्नर ः कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित झालेला भाजीबाजार.
--------
चौदाचौकवाड्यातील भाजीबाजाराचे स्थलांतर
-------------
सिन्नर ः अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास, बाजार समिती आवारामुळे विक्रेत्यांना विविध सुविधा
------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१५ ः शहरातल्या मध्यवस्तीतील चौदा चौक वाड्यात भरणाऱ्या भाजी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले आहे. आता हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरविला जात आहे. वाहतूक कोंडीमुळे बाजार हलविण्याची अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास गेली आहे.
------------
नगराध्यक्ष विठ्ठल उगले, उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे, उपसभापती सिंधूबाई कोकाटे, सचिव विजय विखे यांच्यासह नगरसेवक, बाजार समितीच्या संचालकांनी भाजी बाजार स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न केले.
चौदा चौकवाड्यात भरणाऱ्या भाजीबाजारामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना नगर परिषद क्वार्नर, नगर परिषद परिसर व वावी वेस ते चौदा चौक वाड्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. येथे घाऊक स्वरूपाचा बाजार जास्त प्रमाणात भरत होता. त्यामुळे मध्यरात्री बारापासून ते दुपारी बारापर्यंत वाहनांची वर्दळ होत होती. त्यामुळे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त होत होते. अखेर भाजी बाजाराचे स्थलांतर करण्यात आले आहे.
----------------
आता बाजार समितीच्या कार्यालयासमोरील आवारात हा बाजार सुरु झाला आहे. शेतकरी, व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुविधा, वीज, पाणी आदी व्यवस्था उभारण्यात आली आहे. यापूर्वीही हा बाजार स्थलांतरित करण्याचे प्रयत्न झाले होते. परंतु, सुविधांअभावी पुन्हा शेतकरी व व्यापारी बाजार समितीत येण्यास तयार होत नव्हते. आता सुविधा दिल्यामुळे हा बाजार कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यात आला आहे.
----
चौकट करणे
२०-२
या भाजीबाजारांचेही स्थलांतर
गंगावेस, नाशिकवेस, सरदवाडी रोड येथील रस्त्यात भरणाऱ्या भाजी बाजारांचेही स्थलांतर होणार आहे. वाहतुकीला अडथळा ठरु नये यासाठी हे स्थलांतर करण्यात येणार आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. पर्यायी स्वरूपाची कायमची जागा उपलब्ध करून देवून या बाजारांचेही टप्प्या टप्प्याने स्थलांतर करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे.
-------------
कोट
भाजीबाजाराचे स्थलांतर करताना कुणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घेतली. बाजार स्थलांतरित करण्याअगोदर विक्रेते व शेतकऱ्यांना कायमची पर्यायी जागा सर्व सुविधांसह उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- विठ्ठल उगले, नगराध्यक्ष सिन्नर.
-------------
कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजी बाजारात व्यापाऱ्यांकडून नाममात्र शुल्क घेतले जाईल. परंतु, शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारणी होणार नाही. नगरपरिषदेच्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर हा निर्णय लागू होणार आहे.
- श्रीकृष्ण घुमरे, सभापती, सिन्नर बाजार समिती
-----------------