नीटप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी

नीटप्रकरणी दोषींवर कडक कारवाईची मागणी
Published on
SNR26B20988 सिन्नर ः नीट पेपरफुटी प्रकरणी तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांना निवेदन देताना विद्यार्थी प्रतिनिधी. ------------------ ‘नीट पेपरफुटीप्रकरणी कठोर कारवाई करावी’ ------------- सिन्नर ः नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधींनी केली आहे. याबाबत तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्यासह पोलिस ठाण्यास निवेदन दिले आहे. संतोष सानप, सूरज सानप, रोहित सानप, अखिलेश सानप, रोहित रेवगडे, आदेश कहाणे, गणेश सानप, रामेश्वर सानप, गौरव निकम आदींनी मागणीचे निवेदन दिले. पेपरफुटीमुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा बदनाम झाली आहे, त्यामुळे अटक करण्यात आलेल्या शुभम खैरनार व त्याच्याशी संबंधित असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, सीबीआय तपास करत असली तरी स्थानिक पोलिसांनी इतर कोणत्याही कोचिंग शिकवणीतील व्यक्तींचा समावेश आहे किंवा कसे याबाबत तपास करावा, ज्यांनी हा पेपर खरेदी केला अशा विद्यार्थ्यांना काळ्या यादीत टाकावे, पुन्हा होणाऱ्या परीक्षेवेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवावा, तांत्रिक देखरेख ठेवावी. प्रकरणाती दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थी प्रतिनिधींनी दिला आहे. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com